
निसर्गसंपन्न मालवण
Scuba Diving Parasailing
मालवणचा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ-सुंदर, व हिरवळीने नटलेला असा समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला व महाराजांच्या हात व पायाचे ठसे असलेला सिंधुदुर्ग किल्ला अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. या परिसरात समुद्राचे निळेशार पाणी अतिशय नितळ व स्वच्छ असून येथे सूर्यप्रकाश थेट तळापर्यंत पोहोचतो. तळाशी कोरल्स व रंगीबेरंगी मासे आहेत. अश्या ठिकाणी थोड्या कमी खोल पाण्यात water Sport व Snorkeling व पुढे किल्ल्या लगतच्या जरा खोल पाण्यात Scuba Diving व Parasailing करण्यासाठी नेण्यात येते. Parasailing सुद्धा असाच एक थरारक अनुभव, यासाठी एका स्पीड बोटने आधी किनाऱ्यापासून थोडं दूर, खोल पाण्यात जावे लागते. तेथे बोटीवर असलेले parashut उघडून त्याला हार्नेसच्या सहायाने आपण फिक्स्ड झालो, कि parashut चा दोर हळूहळू सोडला जातो व बोट स्पीड घेते. अन क्षणात आपण शंभर फुट आकाशात तरंगू लागतो, बोट चा स्पीड जसा जसा वाढतो तसं आपण वर जातो. थोड्या वेळात वेग कमी करत दोर गुंडाळला जात आपण बोटीवर Land होतो.
वर्षातील सप्टेंबर ते मे या काळात ही सुविधा येथे उपलब्ध असते. अगदी १५०० ते २००० रुपयात वेगवेगळे water स्पोर्ट अर्थात Parasailing, scuba diving, Snorkeling, व Water Sport क्रीडा प्रकार अनुभवता येतात किंवा फक्त ५०० ते ७०० रुपयात Scuba Diving वगैरे करता येते. विशेष म्हणजे आपण खाली काय बघितले व Diving कसे केले? घाबरले कि एन्जॉय केला याचे शुटींग व फोटो काढून ते तुम्हाला पेनड्राईव्ह मध्ये मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. एकूण काय तर मालवणचा हा अनुभव आपल्या कायम स्मरणात राहून जातो.
Camera & Gear used –
1) Video shoot with : GoPro Hero & Canon Power Shot SX50HS
2) Photographs - Canon Power Shot SX50HS
Music credits-
YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/music?nv=1
Category –Education
0 Comments